व्हेरिकोज व्हेन म्हणजे काय` याची माहिती खालील प्रमाणे डॉक्टर अमोल लाहोटी यांनी दिली आहे
Updated: Mar 20

व्हेरिकोज व्हेन म्हणजे काय ?
व्हिरिकोज व्हेन्स हा पायांना होणारा आजार आहे. हा आजार म्हणजे शिरांची एकप्रकारची पिळवणूक असून, त्यामुळे त्यांची लवचिकता हळूहळू कमी होऊन अंतिम टप्प्यात नष्ट होते. शिरांमधील व्हॉल्व्ह मागील बाजूनं काम करणं कमी करतात, म्हणजे तिथला रक्तप्रवाह खंडीत होत
व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे ?
पायाच्या शिरा निळ्या जांभळ्या होणे
•पायाच्या शिरा फुगून मोठ्या होणे
•पाय आणि पावलावर सूज येणे व्हेरिकोज व्हेन्सवरील त्वचा कोरडी होणे आणि जाड होणे
•सतत पायामधून वेदना आणि जळजळ जाणवणे
•पाय खूप जड होणे आणि चालताना त्रास जाणवणे
•खूप वेळ एकाच ठिकाणी उभे राहणे कठीण वाटणे
•रात्रीच्या वेळी पायात सतत मसल पेन किंवा दुखणे
व्हेरिकोजव्हेन त्रास होऊ नये म्हणून घ्यायची काळजी
• वजन नियंत्रणात ठेवणे
• नियमित व्यायाम करा रोज फिरायला जावे मॉर्निंग वॉक करा
• पायाचा स्टॅचिंग एक्सरसाइज करणे
• एका जागी जास्त वेळ उभे किंवा बसणे टाळा जास्त वेळ बसू नये यामुळे पायाच्या शिरावर ताण पडतो
• झोपताना पायाखाली उशी ठेवावी त्यामुळे पायाकडे रक्त न थांबता हद्याकडे जाण्यास मदत होते
• सीक्रेट धूम्रपान मद्यपान इत्यादी व्यसनांपासून दूर राहा
• आहारातील मिठाचे प्रमाण कमी करणे
• उंच टाचेची चप्पल किंवा बूट घालू नये
• पायामध्ये स्टॉकिंग म्हणजे पायाचे सॉक्स नियमित वापरणे
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा: